पुणे : लाच घेताना वनपरिमंडळ अधिकार्‍याला पकडले

Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: झाडे तोडून वाहतूक करताना पकडलेला टेम्पो सोडण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वन परिमंडळ अधिकार्‍याला रंगेहाथ पकडले. प्रविण अर्जुन क्षीरसागर (वय 40,रा. सावतामाळीनगर,शिरुर) असे या अधिकार्‍याचे नाव आहे. क्षीरसागर हा वन परिक्षेत्र अधिकारी शिरुर प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नेमणुकीला आहे. तक्रारदार हे झाडे तोडणारे ठेकेदार आहेत. ठेका घेतलेली झाडे तोडून तिची टेम्पोने वाहतूक करीत असताना प्रविण क्षीरसागर याने त्यांचा टेम्पो ताब्यात घेतला होता. तक्रारदार यांनी जुन्नर कार्यालयात जाऊन 8 हजार रुपयांचा दंड भरला व 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर घोषणापत्र लिहून दिले.

ते 11 ऑक्टोबर रोजी शिरुर वन कार्यालयात टेम्पो सोडवून घेण्यासाठी आले असता प्रविण क्षीरसागर याने टेम्पो सोडण्यासाठी व पुन्हा कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितली. त्यावर ठेकेदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिरुर वन कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 10 हजार रुपये स्वीकारताना क्षीरसागर याला पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली असून पोलीस निरीक्षक भारत साळुंखे तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news