पुणे : उसतोडणी मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने बालक ठार

पुणे : उसतोडणी मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने बालक ठार
Published on
Updated on

राहू : पुढारी वृत्तसेवा : ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांना घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो चालकाला वळणाचा अंदाज न येऊन टेम्पो उलटल्याने एक चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर इतर दहा कामगार जखमी झाले. संबधित घटना राहू (ता.दौंड) येथील बाळोबा मंदिर परिसरातील वळणावर सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान घडली.

पिंपळगाव येथील एक गु-हाळ चालकाचा हा टेम्पो असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला ससून येथे पुढील उपचारासाठी पाठवले आहे. अनेक मालक प्रशिक्षित चालक न ठेवता ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांना वाहन चालवायला देतात. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात परिसरामध्ये वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. चिमुरड्याच्या मृत्युचे दृश्य  पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news