बारामती : रेशनिंग माल काळाबाजार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

बारामती : रेशनिंग माल काळाबाजार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

बारामती; पुढारी वृत्तसेवा : रेशनिंगच्या मालाचा काळाबाजार करणार्‍या दोघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 2 लाख 67 हजार रुपये किमतीच्या तांदळाच्या 325 पिशव्यांसह 6 लाख रुपयांचा ट्रक असा 8 लाख 67 हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. ट्रकचालक किशोर एकनाथ सावंत (रा. लिंब, जि. सातारा) व संतोष जवाहरलाल शहा (रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी पोपट नाळे यांनी फिर्याद दाखल केली. बुधवारी (दि. 23) ही कारवाई करण्यात आली.

अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी त्यांच्या कार्यालयाकडील सहायक पोलिस निरीक्षक अनिल गुजर, सहायक फौजदार पांडुरंग बनकर, दत्तप्रसाद तांदूळकर, संदीप जाधव, वडगावचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी संयुक्त पथक तयार केले. ट्रक (एमएच 11 एम 4415) मधून रेशनिंगचा तांदूळ नेला जात होता. पोलिसांनी हे वाहन अडवत चालकाला नाव विचारले असता, त्याने किशोर एकनाथ सावंत असे सांगितले.

हा ट्रक पोलिस ठाण्याच्या आवारात लावल्यानंतर लांडे यांनी तहसीलदार विजय पाटील यांना हा माल रेशनिंगचा आहे किंवा कसे, यासंबंधी त्यांच्या स्तरावरून चौकशी व्हावी, असे कळवले. त्यानुसार नायब तहसीलदार विलास करे, पुरवठा निरीक्षक संजय स्वामी यांनी पंचांसह वडगावला जात ट्रकमधील मालाची पाहणी केली. त्यामध्ये 325 पिशव्या होत्या. त्यात तांदूळ भरलेला होता.

पिशव्या उघडून पाहणी केली असता, हा माल रेशनिंगचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी 325 पिशव्यांमधून 17 हजार 790 किलो तांदूळ व 6 लाखांचा ट्रक जप्त केला. संतोष जवाहरलाल शहा याने तो काळ्या बाजाराने खरेदी केला होता. ट्रकचालक व शहा या दोघांवर पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news