चाकण : गंभीर मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

चाकण : गंभीर मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Published on

चाकण (ता. खेड ) : पती-पत्नी यांचे आपल्या घरात कडाक्याचे भांडण सुरू होते. शेजारी राहणार्‍यांना त्यांच्या भांडणाच्या आवाजाचा राग आला. त्यातच तिघांनी पतीला जबर मारहाण केली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केल्याची घटना चाकण येथे घडली आहे.

याबाबत विजय यादव (वय 35 वर्षे, रा. गुप्ता बिल्डिंग, चक्रेश्वर रोड, चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दीपक बिसास याच्यासह दोन आरोपींवर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 2 जणांना अटक केली आहे. आरोपी बिसास याने फिर्यादी यादव याला पाठीमागून पकडून धरले व आरोपी दास व बिसासच्या मित्राने फिर्यादीला लोखंडी रॉडने डोक्यात व हातावर मारून गंभीर जखमी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news