Pune News: आंदेकर टोळी अडचणीत; शिवम आंदेकरसह इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, हप्ता थकल्याने टोळक्याने व्यावसायिकाच्या दुकानातील साहित्य बाहेर फेकून ते जबरदस्तीने टेम्पोत घालून नेले होते.
Pune News
आंदेकर टोळी अडचणीत; शिवम आंदेकरसह इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल file
Published on
Updated on

पुणे: गणेश पेठेतील मासळी बाजारातील एका व्यावसायिकाकडून दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी उकळणार्‍या आंदेकर टोळीतील सराईत शिवम आंदेकर याच्यासह साथीदाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

तसेच त्याच्यासह इतर साथीदारांविरुद्ध खंडणी, दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हप्ता थकल्याने टोळक्याने व्यावसायिकाच्या दुकानातील साहित्य बाहेर फेकून ते जबरदस्तीने टेम्पोत घालून नेले होते. (Latest Pune News)

Pune News
Accident News: कुरकुंभ-दौंड रस्त्यावर एसटी बससह पाच वाहनांचा अपघात; 1 महिला जखमी; सुदैवाने जीवितहानी नाही

शिवम उदयकांत आंदेकर (वय 30, रा. डोके तालीम चौक, नाना पेठ), आकाश परदेशी (वय 30, रा. लोहियानगर) यांना अटक करण्यात आली आहे. तर आंदेकरसह सहा ते सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 38 वर्षीय व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2016 ते मे 2025 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम आंदेकर माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचा मुलगा आहे. त्याच्याविरुद्ध खंडणी, मारामारी, धमकावणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2017 मध्ये त्याला शहरातून तडीपार करण्यात आले होते.

तडीपारीचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तो शहरात आला होता. चतु:शृंगी परिसरात मोटार अडविल्याने एका पोलिस कर्मचार्‍याशी वाद घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी 2021 मध्ये आंदेकरसह पाच जणांना अटक करण्यात आली होती.

फिर्यादींचा गणेश पेठेतील मासळी बाजारात मासे विक्रीचा व्यवसाय आहे. 2016 मध्ये शिवम आंदेकरने फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देऊन दरमहा 50 हजार रुपयांचा हप्ता मागितला होता. आकाश परदेशी गेले आठ वर्ष व्यावसायिकाकडून दरमहा 50 हजार रुपये हप्ता घेत होता.

Pune News
Agristack Registration: राज्यात ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ अंतर्गत शेतकरी नोंदणीचा 1 कोटीचा टप्पा ओलांडला

गेल्या आठ वर्षात आंदेकर आणि साथीदारांनी व्यावसायिकाकडून 48 लाख रुपये हप्ता घेतला होता. हप्ता न दिल्याने मे महिन्यात शिवम, आकाश आणि साथीदारांनी त्याच्या दुकानातील साहित्य फेकून दिले होते. काही साहित्य टेम्पोतून घालून नेण्यात आले होते. घाबरलेल्या व्यावसायिकाने शुक्रवारी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन शिवमसह साथीदार आकाशला अटक केली. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी ही कारवाई केली.

व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्या-प्रकरणी शिवम आंदेकर आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर चार ते पाच जणांविरुद्ध खंडणी, दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

- प्रशांत भस्मे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, फरासखाना ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news