पुणे : भाड्याचे पैसे नसल्याने रिक्षाचालकाचा परदेशी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार | पुढारी

पुणे : भाड्याचे पैसे नसल्याने रिक्षाचालकाचा परदेशी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

भाड्याचे पैसे नसल्याच्या मजबुरीतून एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसचे, पिडीत मुलगी व तिच्या मैत्रीनीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर हडपसर पोलिसानी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

सागर विभीषण बचुटे (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर), विकीकुमार फुलो पासवान (वय २३,) आणि अशोक वीरबहाद्दूर थापा (वय २२, दोघीही रा. फुरसुंगी ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सागर हा रिक्षा चालक आहे. तर, इतर दोघे किरकोळ कामे करतात. याबाबत १६ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी व तिची मैत्रिण या पाच जानेवारी रोजी बुधवार पेठ येथे रिक्षाने येत होत्या. पण, त्यांच्यावर रिक्षा भाड्याचे पैसे देण्यासाठी नव्हते. त्यामुळे आरोपी सागर याने रिक्षा भाडे देण्यासाठी पैसे नसल्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन पिडीत मुलीवर रेसकोर्स परिसरातील झाडीमध्ये बलात्कार केला.

तसेच, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पिडीत मुलगी राहत असलेल्या ठिकाणी आरोपी पासवान व थापा गेले. त्यांनी पिडीत मुलगी व तिच्या मैत्रिणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबत दोघींनी हडपसर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस तपास करत आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button