wrestler abhijeet katke : उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेंच्या बंगल्यात चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

wrestler abhijeet katke : उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेंच्या बंगल्यात चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटके यांच्या बंद बंगल्यातून २८ लाख ७७ हजार रुपयांचा किंमती ऐवज चोरी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा बंगला त्यांच्याच सुरक्षा रक्षकाने फोडल्याचे देखील समोर आले असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. (wrestler abhijeet katke)

याप्रकरणी विकास कदम (वय ३९, रा. दांडेकर पुल) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बल बहादुर कामी (रा. नेपाळ) व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी पहाटे ४ ते ६ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. आरोपी बल बहादुर हा एक महिन्यापुर्वीच कटके यांच्या बंगल्यात कामाला आला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसात हा प्रकार समोर आला आहे.

wrestler abhijeet katke : घरात कोणीही नसल्याचा घेतला फायदा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमहाराष्ट्र केसरी व पैलवान अभिजीत कटके यांचे कुटूंबीय लोणीकंद भागात कटकेवाडी परिसरात राहतात. त्यांचा येथे बंगला आहे. दरम्यान, त्यांचे आई-वडील येथे राहतात. तर, अभिजीत कटके हे तालमीत असतात.

दरम्यान, वडील चंद्रकांत कटके हे देखील पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तालमीत जातात. त्यांनी घरावर लक्ष ठेवण्यासाठी एक सुरक्षा रक्षक ठेवला होता. एक महिन्यांपुर्वीच त्यांनी या सुरक्षा रक्षकाला कामास ठेवले होते.

तत्पुर्वी त्यांची आई या दोन दिवसांपुर्वी गावाला गेल्या होत्या. तर, वडील सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तालमीत आले होते. अभिजीत हे तालमीतच होते. त्यामुळे घरी कोणीच नव्हते. याच संधीचा फायदा घेत सुरक्षा रक्षक व त्याच्या साथीदाराने बंगल्याच्या पाठीमागील खिडकीला बसविलेले ग्रीलचे स्क्रु काढले.

तसेच, एक्सा ब्लेडने ते कट केले व बंगल्याच्या आत प्रवेश केला. त्यानंतर येथील सोन्याचे दागिने, चांदी तसेच रोख १० लाख रुपये असा एकूण २८ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सुरक्षा रक्षकानेच चोरी केल्याचा प्रकार

सकाळी कुटूंब परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीसांना घटनेची माहिती दिली. तात्काळ लोणीकंद पोलीसांनी धाव घेतली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील पवार करत आहेत.

दरम्यान मागील काही दिवसापासून शहरात घरफोड्याचे सत्र वाढले आहे. प्रामुख्याने बंद घरांना चोरट्यांकडून टार्गेट केले जाते आहे. तर पाळत ठेवून देखील घरावर डल्ला मारला जातो आहे. अशातच आता सुरक्षा रक्षकानेच घरात चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news