पिंपरी : महापालिकेचे मिशन शिष्यवृत्ती | पुढारी

पिंपरी : महापालिकेचे मिशन शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यास संधी : अप्रगत विद्यार्थ्यांनाही अभ्यासाचे वातावरण

पिंपरी : वर्षा कांबळे : पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा म्हटले, की निकाल चांगला लागण्याच्या दृष्टीने फक्त प्रगत विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

मात्र, या वर्षी तसे न करता शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र ठरवावे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट करावे.

हरभजन सिंग खेळणार राजकीय ‘इनिंग’? : विविध पक्षांची ऑफर

जेणेकरून अप्रगत विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबाबत एक सकारात्मक वातावरणनिर्मिती होईल. यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने ‘मिशन शिष्यवृत्ती’ कार्यक्रम हाती घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांचा इयत्ता 5 वी चा निकाल 5. 1 टक्के तर आठवीचा निकाल 6.6 टक्के इतका लागला आहे. हा निकाल पाहता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परिक्षेसाठी विशेष लक्ष देत त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मिशन शिष्यवृत्ती कार्यक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला असल्याची माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी दिली.

पुणे : अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल : उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची सवय व्हावी हा यामागचा हेतू आहे. त्यांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र ठरवावे, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबाबत एक सकारात्मक वातावरण निर्मिती होईल.

यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट करावे. तसेच एकूण विद्यार्थ्यांपैकी 50 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतील आणि 10 टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतील यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मंगळवेढा : सांगलीच्या दोघांचा अपघातात जागीच मृत्यू

तसेच यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण 20 डिसेंबर पासून सुरु करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत पालिका शाळातील पाचवी आणि आठवी इयत्तेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करण्यात येईल.

तसेच यासाठी शिक्षकांचे चार दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण सुरु झाले आहे. राज्यातील शिष्यवृत्तीत तज्ज्ञ असलेली 8 मंडळी यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत.

जळगाव : कन्वेयर बेल्टवर पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू

महापालिकेचे 350 हून अधिक मुख्याध्यापक, शिक्षक याचे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांच्या 3 सराव चाचण्या महापालिकेच्या वतीने घेण्यात येतील.

Back to top button