वीस हजार विद्यार्थ्यांची परवड | पुढारी

वीस हजार विद्यार्थ्यांची परवड

महाविद्यालयात जाण्यासाठी करावी लागतेय कसरत

पिंपरी : पंकज खोले : पुणे-लोणावळा लोकल सेवा अपुरी व विस्कळीत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. मावळ, ग्रामीण भागातून पिंपरी-चिंचवड, पुण्यात शिकण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना त्याची झळ बसत आहे.

एसटीची सेवा बंद असल्याने पीएमपीच्या सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान, लोकलच्या फेर्‍या वाढविण्यात याव्यात, यासाठी वीस हजार विद्यार्थ्यांनी विविध शाळा प्रशासनाच्या माध्यमातून रेल्वे प्रवासी संघटनेकडे मागणी केली आहे.

व्यावसायिकावरील छाप्यात सापडलं घबाड, नोटा मोजताना अधिकाऱ्यांना फुटला घाम

पुणे-लोणावळा लोकल सेवा अपुरी व विस्कळीत

लोणावळा, तळेगाव यासह विविध भागातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लोकल सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. या परिसरातील जवळपास दहा शाळा, महाविद्यालयांनी तर लोणावळा येथील आयटीआयचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी याबाबत मागणी केली आहे.

या प्रत्येक शाळेतील जवळपास एक ते दीड हजार विद्यार्थी विविध ठिकाणी राहण्यास आहेत. सध्या लोणावळा ते पुणे या मार्गावर दोन्ही वेळेस जवळपास 12 फेर्‍या होतात. मात्र, त्या नेमक्या शाळा, महाविद्यालयाच्या वेळेशी जुळत नाही.

या पूर्वी 44 फेर्‍या होत्या. त्या वेळी विद्यार्थ्यांना प्रवास करणे सोईस्कर होते. सध्या जनरल तिकीट उपलब्ध नसल्याने या लोकल व्यतिरीक्त अन्य रेल्वेचा वापर या विद्यार्थ्यांना करता येत नाही.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ४ बालकांचा ‘सेप्टिक शॉक’ने मृत्यू

मासिक पाससेवा पूर्ववत करावी

पुणे-मुंबई रेल्वे सेवा काहीअंशी सुरू झाली आहे. मात्र, त्यासाठी प्रवास करणार्‍या प्रवाशांना सोईस्कर असा मासिक पास सुरू नाही. कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर पश्चिम व उत्तर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मासिक पास देण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाबाबत नाराजी आहे. राज्य शासनाने शिफारस केल्यास ती सुविधा सुरू करू, असे सांगितले असल्याने त्याची दखल घेण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनेचे इक्बाल मुलाणी यांनी सांगितले.

Murder Mystery : ‘४२ लेकरांचं हत्याकांड : ‘त्या’ तीन स्त्रीयांची क्रूरता’, काय आहे कोल्हापूर कनेक्शन?

सात हजार विद्यार्थी करतात प्रवास

शहराला लागून असलेल्या लोणावळा, वडगाव, तळेगाव, कामशेत, मळवली या भागातून रेल्वेने प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास सात हजार आहे. मात्र, सद्यःस्थितीत रेल्वेच्या तुरळक फेर्‍या सुरू आहेत.

सध्या केवळ बारा फेर्‍या सुरू असून, पिक अवरला त्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यात वाढ करून आणखी चार फेर्‍या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे.

सुशांतच्या चाहत्यांनी ट्विटरवर #Boycott83 चा ट्रेंड का केला आहे?

  • वीस हजार विद्यार्थ्यांची लोकल सेवा सुरू करण्याची मागणी
  • मुंबई-नाशिकप्रमाणे एमएसटी
  • पास पुणे-मुंबई द्यावेत
  • लोकलच्या फेर्‍या वाढवाव्यात
  • शाळा, महाविद्यालये सुटण्याच्या वेळी फेर्‍या नाहीत

Back to top button