murder : शेलपिंपळगाव येथे गोळ्या झाडून तरुणाची हत्या | पुढारी

murder : शेलपिंपळगाव येथे गोळ्या झाडून तरुणाची हत्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील (जि. पुणे) शेलपिंपळगाव येथे एका तरुणाचा भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून ( murder ) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गुरुवारी (दि. २३)  रात्री नऊच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला आहे. नागेश सुभाष कराळे ( वय ३७, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून ( murder ) झालेल्या तरुणाचे नाव आहे.

(एम एच १४ जे जे १३२३) क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या थार मोटारीत त्यांच्यावर गोळीबार ( murder ) करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हल्लेखोर फोर्ड फिगो कंपनीच्या ( क्र. ६१८३) वाहनातून आलेले असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी चार राउंड फायर केल्याचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

या घटनेने तालुक्यातील नागरिकांसह पोलिस यंत्रणा पुरती हादरली आहे. भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची हि घटना कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावणारी आहे.

नागेश कराळे हे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील रस्त्यालगत आपल्या मोटारीत बसत असताना लगतचा दबा धरून बसलेले हल्लेखोर अचानक एका मोटारीतून आले. मारेकऱ्यांनी त्यांना भर रस्त्यात गाठले. त्यांच्यावर पिस्तुलातून एकापाठोपाठ गोळ्या झाडल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. यात गंभीररित्या जखमी झालेला कराळे यास तत्काळ चाकण येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

घटनेनंतर मारेकरी पसार झाले असून चाकण पोलिसांची पथके शेलपिंपळगाव येथे रवाना झाली आहेत. दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे या भागात मोठा गोंधळ उडाला आहे. जुन्या वादातून हि घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. खून झालेले कराळे हे जिल्ह्यातील एका नेत्याचे जवळचे नातेवाईक आहेत. तालीम चालवणारे नागेश कराळे हे या भागात पैलवान म्हणून ओळखले जात होते.

दरम्यान चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित वाहनाची तपासणी केली आहे. चाकण पोलिसांनी काही भागात नाकाबंदी देखील केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शेलपिंपळगाव येथे धाव घेतली आहे. कराळे यांना चार गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अद्याप पोलिसांच्या हाती कुणीही लागलेले नसल्याची माहिती समोर येत आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Back to top button