Pune Fire News : अग्निशमन दलाकडून आगीमध्ये अडकलेल्या ९ वर्षाच्या मुलीची सुटका

Pune Fire News : अग्निशमन दलाकडून आगीमध्ये अडकलेल्या ९ वर्षाच्या मुलीची सुटका
Published on
Updated on

पुणे : काल मध्यराञी बाराच्या सुमारास काञज परिसरातील भारती विद्यापीठ समोर, नॅन्सी लेक होम या इमारतीत आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळताच, काञज, गंगाधाम, कोंढवा बुद्रुक येथून अग्निशमन दलाकडून एक रेस्क्यु व्हॅनसह ४ वाहने रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच ११ मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर १५६० स्क्वे. फुट सदनिकेत मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे पाहताच जवानांनी चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला. त्याचवेळी घरामधे कोणी अडकले आहे का याची खाञी करत असताना एक लहान मुलगी (कु. राजलक्ष्मी दिलिप सुकरे. वय वर्ष ९) खिडकीमधील लोखंडी ग्रिलमधे अडकल्याने वाचवण्याकरिता आरडाओरडा करत होती.

त्याचवेळी जवानांनी तातडीने मुलीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. दोन बी ए सेट तसेच हायड्रोलिक कटर, कटावणी, रश्शीचा वापर करत खिडकीजवळ शिडी लावून तसेच काही जवानांनी शेजारील सदनिकेच्या गच्चीवरुन मुलीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. अवघ्या पाच ते दहा मिनिटात जवानांच्या प्रयत्नाला यश आलं. आगीमधे अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली.

काही मिनिटातच घरावरील आग नियंञणात आली. घराचे मोठे नुकसान झाले असून आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. या घटनेत जिवातहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या कामगिरीत दलाचे अधिकारी प्रदिप खेडेकर, वाहन चालक येरफुले, अतुल मोहीते, तांडेल मंगेश मिळवणे व जवान रामदास शिंदे, तेजस मांडवकर, चंद्रकांत गावडे, सुधीर नवले, लक्ष्मण घवाळी, दिगंबर बांदिवडेकर, तेजस खरीवले, अर्जुन यादव, अभिजित थळकर यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news