‘आयकर’च्या भीतीने पावणेदोन कोटी उकळले | पुढारी

‘आयकर’च्या भीतीने पावणेदोन कोटी उकळले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

बँक खात्यावरील रक्कम जादा झाल्याने आयकर विभाग, पोलिस विभाग यांची भीती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाकडून एक कोटी 85 लाख उकळण्यात आले.

हा प्रकार फेब्रुवारी 2014 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत कोकणेनगर, काळेवाडी येथे घडला.

शेतकरी ‘विजयी’ रॅलीने घरी परतणार

आप्पासाहेब पांडुरंग मिठारी (63, रा. कोकणेनगर, काळेवाडी) यांनी गुरुवारी (दि. 9) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, पोलिसांनी मनिष मेहता, संजय कुलकर्णी, गणेश ठाकूर , पियुष, अनिकेत, विलास शाखापुरे, नरेंद्र प्रसाद यादव, सतीश पाटील, संतोष रायकर, राहुल सावंत, प्राची मॅडम, श्रृती अग्रवाल, हरीश रेड्डी, सदाशिव रामचंद्र पाटील या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उर्फी जावेदचा आतापर्यतचा सर्वात बोल्ड फोटोशूटचा सोशल मीडियावर धुमाकूळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी मिठारी यांना फोन करून ऍगॉन रिलीगिअर लाईफ इन्शुरन्स,

रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसी घेण्यासाठी तसेच त्यामध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर पैसे मिळवून देतो, असे अमिष दाखविले.

पुणे विद्यापीठ : ११९ वा पदवी प्रदान सोहळा; विद्यार्थ्यांना माहिती नसल्‍याने गोंधळ

त्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यावरील रक्कम जादा झाल्याचे सांगून आयकर विभाग, आयआरडीए ब्रँच मॅनेजर, क्राईम ब्रान्च पोलिस अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी यांना भीती घातली. फिर्यादी यांच्याकडून 39 लाख 71 हजार रुपये रोख,

तसेच विविध बँकेच्या खात्यावर धनादेशाद्वारे एक कोटी 45 लाख 34 हजार 66 रुपये असे एकूण एक कोटी 85 लाख पाच हजार 66 रुपयांची फसवणूक केली.महिला पोलिस उपनिरीक्षक संगिता गोडे तपास करीत आहेत.

Back to top button