जुन्नरमध्ये कमी पटसंख्या असलेल्या 82 शाळा

जुन्नरमध्ये कमी पटसंख्या असलेल्या 82 शाळा
Published on
Updated on

लेण्याद्री; पुढारी वृत्तसेवा: कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणार, अशी जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू, तर या विषयावर गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा सुरू असून, याबाबत आजतायागत कोणत्याही सरकारने निर्णय घेतला नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळे यंदाही कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत, असे या क्षेत्रातील जाणकार मंडळींना वाटत आहे.

दरम्यान, जुन्नर तालुक्यातील 355 शाळांपैकी तब्बल 24 टक्के म्हणजेच 82 शाळांचा पट 20 किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे आकडेवारी सांगत आहे. यातील अनेक शाळा दुर्गम भागांतील आहेत. जर दोन जवळच्या अंतरावरील शाळांचे एकत्रीकरण केले तरी विद्यार्थ्यांची येण्या-जाण्याची व्यवस्था, निर्माण होणारे अतिरिक्त शिक्षक, लाखो रुपये खर्चून उभारलेल्या इमारती आदींबाबत विचार होणे आवश्यक आहे.

जुन्नर तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांची गावे व कंसात पटसंख्या पुढीलप्रमाणे :
कालदरे (12), धालेवाडी (17), वानेवाडी (12), डामसेवाडी (17), विरणकवाडी (17), भिवाडे बु. (16), राळेगण (11), सुकाळवेढे (14), हातविज (13), ठाकरवाडी (11), बांबळेवाडी (16), आंबेदरा (10), हिवरे तर्फे मिन्हेर (15), रानचरी (12), खैरे (13), हिरडी (11), अंजनावळे (20), राजूर नं. 2 (15), मुंढेवाडी (10), हडसर (16), कातकरीवस्ती (15), कुकडीनगर (18), भुंडेवाडी (16), बोरीचीवाडी (18), गोडेवाडी (5), कवटेवाडी (16), तळेरान (16), तळमाची (17), ठाकरवाडी-सीतेवाडी (17), पांगरी तर्फे मढ (16), सांगनोरे (17), भोईरवाडी (20), जांभूळशी (8), बांगरवाडी (16), काठेवाडी (13), भवानीनगर (11), धराडेवाडी (5), फापाळेशिवार (8), तांबेमळा (5), चिल्हेवाडी (17), गडवाडी (4), भैरवनाथनगर (20), साबरवाडी (19), ढमालेमळा (15), धावशी (16), पाथरटवाडी (7), शिंदेवाडी (9), वरखडेवस्ती (5), बादशाहतलाव-उर्दू (10), विठ्ठलवाडी (18), पानसरेवाडी (6), गवारवाडी (6), काटेडे (18), बेलसर (19), चिंचोली-उर्दू (3), गाढवेवाडी (11), काचळवाडी (17), आढी (20), दरंदाळेमळा (9), सुतारठिके (20), अभंगवाडी (11), दांगटवाडी (7), काकडपट्टा (7), वाघपट्टा (7), वाळुंजवाडी (15), नेहरवाडी (15), भिसेमळा (17), बेंदमळा (15), खानेवाडी (15), मुंढेवाडी (18), आगर (17), मोरदरा (15), गावठाण (10), वसई (5), माळवाडी (6), विश्वासरावमळा (16), पिंपळझाप (18), कोंबरवाडी (0), आनंदवाडी (16), नवलेवाडी (10), सुरकुलवाडी (17), व्हरुंडी (11).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news