उन्हामुळे पालेभाज्या कडाडल्या; कोथिंबीर 60 तर मेथी 40 ते 50 रुपये गड्डी

उन्हामुळे पालेभाज्या कडाडल्या; कोथिंबीर 60 तर मेथी 40 ते 50 रुपये गड्डी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मान्सूनपूर्व पावसासह उन्हाच्या तडाख्याने पुण्यातील बाजारात पालेभाज्यांची आवक रोडावली आहे. कमी प्रमाणात पालेभाज्या दाखल होत असून, त्यांच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. शहरात कोथिंबीर व मेथीचे दर 50 ते 60 रुपयांवर पोहोचले असून, मेथी, कांदापात व चाकवतचे दर 40 रुपयांवर गेले आहेत. अन्य पालेभाज्यांचे दर 30 रुपये गड्डीवर गेले आहेत.

अवकाळी पाऊस व उन्हाचा चटका वाढल्याने पालेभाज्यांवर डाग पडले आहेत. त्यामुळे, पालेभाज्यांच्या प्रतवारीत घसरण झाली आहे. बहुतांश ठिकाणी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कमी प्रमाणात पालेभाज्या बाजारात दाखल होत आहेत. याचा परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे.

– चरण वणवे, पालेभाज्या विक्रेते.

बाजारात दर्जाहीन पालेभाज्या

गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात पुणे विभागासह नाशिक व लातूर भागांतून एक ते सव्वा लाख कोंथिबिरीच्या जुडींची आवक होत आहे, तर मेथीच्या 50 हजार जुड्यांची आवक होत आहे. बाजारात दर्जाहिन पालेभाज्या मोठ्या प्रमाणात असून, डाग पडलेल्या मालांची कमी भावाने विक्री करण्यात येत आहे. तर, दर्जेदार पालेभाज्यांना चांगला दर मिळत आहे. मान्सून आल्यानंतरही पुढील महिनाभर पालेभाज्यांचे हेच दर कायम राहतील, अशी शक्यता पालेभाज्या विक्रेत्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

पालेभाजी दर प्रतिगड्डी

  • कोथिंबीर 50 ते 60 रुपये
  • शेपू 50 ते 60 रुपये
  • कांदापात 40 रुपये
  • चाकवत 40 रुपये

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news