विद्यापीठात सायबर सिक्युरिटीवर अभ्यासक्रम : जूनपासून राबविणार अभ्यासक्रम

विद्यापीठात सायबर सिक्युरिटीवर अभ्यासक्रम : जूनपासून राबविणार अभ्यासक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ट्रान्सिडेंटल टेक्नॉलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात सायबर सिक्युरिटी, सायबर फॉरेन्सिक्स आणि सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन या विषयांतील सर्वसमावेशक व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येत्या 13 जून 2024 पासून सुरू होणारा हा अभ्यासक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात येणार आहे. विद्यार्थी, व्यावसायिक आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये माहिती प्रणालीचे रक्षण करण्याची आणि सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक कौशल्ये असावीत, या उद्देशाने हा अभ्यासक्रम बनविण्यात आला आहे.

यात दोन महिन्यांचा कालावधी असलेला 18 क्रेडिटचा सायबर सिक्युरिटी स्पेशॅलिस्ट, सहा महिन्यांचा कालावधी असलेला 20 क्रेडिटचा मास्टरिंग इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आणि सहा महिन्यांचा कालावधी असलेला 28 क्रेडिटचा सायबर क्राइम इन्वेस्टिगेटर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे अभ्यासक्रम डायरेक्ट अ‍ॅक्शन इंटरनॅशनल यूके आणि कॅनेडियन असोसिएशन फॉर सिक्युरिटी अँड इंटेलिजेन्स स्टडीज, व्हँकुव्हर कॅनडाद्वारे मान्यताप्राप्त आहेत. या अभ्यासक्रमात आक्षेपार्ह आणि बचावात्मक सुरक्षा, एसओसी आणि एसआयईएम, सायबर इंटेलिजन्स आणि इन्व्हेस्टिगेशन, डार्क वेब, सायबर फॉरेन्सिक्स आणि क्लाउड सुरक्षा, नेटवर्क सुरक्षा आणि क्रिप्टोग्राफी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश केला आहे. या अभ्यासक्रमात सायबर सिक्युरिटी, कायदा अंमलबजावणी आणि नॅशनल सिक्युरिटी क्षेत्रातील 40 हून अधिक राष्ट्रीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

एसपीपीयू, तंत्रज्ञान विभागातर्फे ऑफर केलेला सायबर सुरक्षा अभ्यासक्रम हा अशा प्रकारचा अनोखा आणि पहिला उपक्रम आहे, जो उद्योग विशेषज्ञ आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांद्वारे शिकविला जाणारा सखोल व्यावहारिक दृष्टिकोन आणि ज्ञान प्रदान करणारा उपक्रम आहे.

– प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, एसपीपीयू

हे अभ्यासक्रम विद्यार्थी, व्यावसायिक आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या कर्मचार्‍यांना वाढत्या चिंतेचे निराकरण आणि त्यांच्या माहिती प्रणालीचे रक्षण करण्यासाठी, तसेच सायबर गुन्ह्यांना अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आवश्यक असणार्‍या कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करतील, जे ट्रान्सिडेंटल टेक्नॉलॉजीज इंडियाने व्हिजन फॉर द नेशन – सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी इंडिया या प्रमुख उपक्रमांतर्गत सुरू केले आहे.

– डॉ. केतन अत्रे, संस्थापक, ट्रान्सिडेंटल टेक्नॉलॉजी

सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रम हे विद्यार्थी आणि कार्यरत व्यावसायिकांमध्ये सायबर सुरक्षा जागरूकता आणि कौशल्य- निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तंत्रज्ञान विभागाचे हे अभ्यासक्रम मजबूत सुरक्षा उपाय लागू करून आणि सायबर हल्ले कमी करून भेद्यता ओळखण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावहारिक ज्ञानाने सुसज्ज करतील.

– डॉ. पराग काळकर, प्र- कुलगुरू, एसपीपीयू

विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानासह, सायबर सुरक्षा धोके आणि हल्ले वेगाने वाढत आहेत. कॉर्पोरेट, संस्था आणि सरकारांसाठी ही एक मोठी चिंतेची बाब आहे. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाद्वारे ऑफर केलेले सायबर सुरक्षा अभ्यासक्रम हे सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी सर्वार्थाने परिपूर्ण असे अभ्यासक्रम आहेत.

– डॉ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव, एसपीपीयू

मला खात्री आहे की, तंत्रज्ञान विभागातर्फे ऑफर केलेल्या सायबर सुरक्षा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी मिळतील आणि त्यांना सायबर सुरक्षा क्षेत्रातील अधिक सखोल ज्ञान प्राप्त करून घेता येईल.

– डॉ. आदित्य अभ्यंकर, विभागप्रमुख, तंत्रज्ञान विभाग, एसपीपीयू

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news