Cyber Crime | सायबर चोरट्यांकडून ६ जणांची ८० लाखांची फसवणूक

Cyber Crime | याप्रकरणी विमानतळ, कोंढवा, कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
80 lakh fraud of 6 people by cyber thieves
Cyber attackFile Photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या थापा मारत शहरातील ६ जणांची ७९ लाख १८ हजार २२९ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी विमानतळ, कोंढवा, कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (Cyber Crime)

80 lakh fraud of 6 people by cyber thieves
गांधीनगर : जादा परताव्याच्या आमिषाने सव्वा कोटीला गंडा

फ्री टिप्स देण्याच्या आमिषाने फसवणूक शेअर ट्रेडिंगच्या फ्री टिप्स देण्याच्या आमिषाने एकाची ३० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी विमाननगर भागात राहणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

ही घटना १६ डिसेंबर २०२३ ते १२ फेब्रुवारी २०२४ दरम्यानच्या काळात घडली आहे. सायबर चोरट्याने फिर्यादी यांच्याशी संपर्क करून शेअर ट्रेडिंगमध्ये फ्री टिप्स देण्यात येतील, असे सांगितले. यानंतर शेअरमध्ये चांगला नफा होईल, असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांत ३० लाख पाठवायला लावून फसवणूक केल्याचे फियदित नमूद केले आहे.

आयपीओमध्ये गुंतवणुकीचे आमिष

प्राइमरी मार्केट अॅक्सेस उपलब्ध करून देत अप्पर व लोअर सक्रिट व आयपीओमध्ये गुंतवणुकीचे आमिषाने एकाची २० लाख १८ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल दिली आहे. त्यावरून कोथरूड पोलिसांनी (Pune Police) व्हॉट्सअप ग्रुप व अॅपचे खातेधारक यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादी हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. दरम्यान, त्यांना सायबर चोरट्यांनी प्राइमरी मार्केट अॅक्सेस उपलब्ध करून दिले. त्यांना अप्पर व लोअर सक्रिट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणूक केल्यास त्यांना प्रथम ६० हजार रुपये देत विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण २० लाख १८ हजार रुपये भरण्यास भाग पाडत फसवणूक केली.

80 lakh fraud of 6 people by cyber thieves
राज्यसभेवर नितीनकाका की भाजपचा उमेदवार?

टास्कच्या आमिषाने फसवणूक

गुगल रिव्हियूचा टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा देण्याच्या आमिषाने एकाची ३ लाख ६१ हजार ८०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी धानोरी भागात राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १० ते १८ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या काळात घडली आहे.

पोलिस निरीक्षक साळुंखे करत आहे. याचबरोबर कल्याणीनगर येथील एकाची टास्कच्या आमिषाने ३ लाख ७ हजार १०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बिलाची थकबाकी असल्याचे सांगून फसवणूक

गॅसच्या बिलाची थकबाकी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ९४ हजार २३९ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी उंड्री भागात राहणाऱ्या एकाने ८५ वर्षीय कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १३ जून रोजी घडली.

शेअरच्या आमिषाने गंडा

शेअर ट्रेडिंगमार्फत जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून एकाची १८ लाख ३७ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने कोथरूड ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, केवल जोशी, साक्षी सिंग अशी नावे सांगणाऱ्यासह टेलिग्राम आयडीधारक व इतरांवर आयटी अॅक्ट व फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

हा प्रकार ५ मे ते ९ जुलै २०२४ या कालावधीत घडला आहे. तक्रारदार खासगी कंपनीत नोकरीस आहेत. दरम्यान, त्यांना सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यांनी स्वतःच्या व पत्नीच्या खात्यावरून एकूण १८ लाख ३७ हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news