Pune Crime | मारहाण करीत मंगळसूत्र पळविले

Pune Crime | मारहाण करीत मंगळसूत्र पळविले
Published on
Updated on

मंचर : पुढारी वृत्तसेवा : निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील थोरातमळा येथे चोरी झाली असून ज्येष्ठ महिला कलाबाई शंकर थोरात (वय 84) यांना चोरट्यांनी मारहाण करत त्यांच्या गळ्यातील 25 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 28) पहाटे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, निरगुडसर येथील थोरातमळा येथे प्रगतशील शेतकरी जयसिंग शंकर थोरात हे राहतात. ते कुटुंबासमवेत त्यांच्या बंगल्यात झोपले होते. दरम्यान रात्री दीड ते पावणेदोन वाजेच्या दरम्यान तीन ते चार चोरट्यांनी किचनचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. प्रथम वर जाऊन जयसिंग थोरात यांच्या बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर शेजारच्या खोलीत जाऊन उचकापाचक करून घरातील सामान अस्ताव्यस्त केले. त्यानंतर खाली झोपलेल्या कलाबाई शंकर थोरात यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. त्यावेळी कलाबाई या उठल्या असता चोरट्याने त्यांचे तोंड दाबून त्यांना मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने ओढले. कानातील दागिने तेथेच पडले; मात्र चोरून चोरटे मंगळसूत्र घेऊन पसार झाले.

कलाबाई थोरात यांनी आरडाओरडा केल्यानंतर जयसिंग थोरात उठले; मात्र दरवाजा बंद असल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. त्या वेळी त्यांनी बाबाजी थोरात यांना संपर्क केला. बाबाजी थोरात यांनी येऊन दरवाजा उघडला. त्यानंतर रामदास थोरात, चंद्रकांत थोरात, वसंतराव थोरात, रामदास मिंडे, नवनाथ थोरात हे घटनास्थळी आले. घटनेची माहिती घेऊन आजूबाजूच्या वस्तीवर चोरी झाल्याबाबत माहिती दिली व नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news