आता प्रवेशासाठी चुरस..! मिशन अ‍ॅडमिशन अकरावी प्रवेशाकडे लक्ष

आता प्रवेशासाठी चुरस..! मिशन अ‍ॅडमिशन अकरावी प्रवेशाकडे लक्ष
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी-पालकांचे लक्ष अकरावी, डिप्लोमा, आयटीआय प्रवेशाकडे लागले असून, या तिन्ही अभ्यासक्रमांपैकी अकरावी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या काही दिवसांमध्ये तंत्रशिक्षण डिप्लोमा तसेच आयटीआयसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. यंदा 81 हजार 991 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण, तर 5 लाख 58 हजार 21 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस राहणार आहे.

राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महापालिका क्षेत्रांत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू असून, पुण्यात साधारण 28 हजार 373 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीचा निकाल लागल्यामुळे आता विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरावी प्रवेशासाठी गेल्या वर्षाप्रमाणेच जागा उपलब्ध राहणार आहेत. काही ठिकाणी नव्या महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने जागा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी अकरावी प्रवेशासाठी एक लाखावर जागा उपलब्ध होत्या. त्यात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे.

आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीव्हीईटी) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया येत्या एक ते दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मिळून दीड लाखाहून अधिक जागा उपलब्ध होत्या. आयटीआय प्रवेशाकडे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे अकरावीपेक्षा जास्त चुरस आयटीआय प्रवेशासाठी पाहायला मिळते. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https:///
admission. dvet. gov. in या वेबसाइटला भेट द्यावी.

पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया लवकरच

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी साधारण एक लाखावर जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या सविस्तर माहितीसाठी https:/// dte. maharashtra. gov. in या वेबसाइटवर भेट द्यावी.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news