पुणे : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांचा हल्ला | पुढारी

पुणे : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांचा हल्ला

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर आज (दि.२४) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी हल्ला केला. शहरातील संविधान चौकात अज्ञात हल्लेखोरांनी मिरचीची पूड टाकून हल्ला केला. यावेळी शासकीय वाहन असणाऱ्या गाडीच्या पुढील बाजूच्या काचाही फोडण्यात आल्या. (Pune News)

मिरचीची पूड टाकून हल्ला

माहितीनुसार, इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील व चालक गाडीत होते. गाडी शहरातील संविधान चौकात आल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून त्या ठिकाणावरून त्यांनी पळ काढला. यावेळी श्रीकांत यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. मिरचीची  डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर हल्ला करुन पशार झाले. ही घटना सकाळी अकाराच्या सुमारास घडली.

या घटनेत सरकारी वाहनाचेही नुकसान झाले आहे. या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून, इंदापूर तालुक्याच्या चोहोबाजूने नाकाबंदी करण्यात आली आहे. (Pune News)

हेही वाचा 

Back to top button