12 th result : खेडमध्ये यंदाही मुलींचीच बाजी; 4 शाळांची शंभरीपार | पुढारी

12 th result : खेडमध्ये यंदाही मुलींचीच बाजी; 4 शाळांची शंभरीपार

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.59 टक्के लागला. यंदाही मुलींनीच बाजी मारली. तालुक्यात यावर्षी केवळ 4 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. खेड तालुक्यातून बारावीच्या परीक्षेला 33 कनिष्ठ महाविद्यालयाचे 5 हजार 232 विद्यार्थी बसले होते. यापैकी 4 हजार 897 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 96.94 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 90. 55 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. तालुक्यात सर्वाधिक कमी 62. 06 टक्के निकाल सुभाष माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, बहुळचा लागला आहे.

इतर महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे – हुतात्मा राजगुरु महाविद्यालय, राजगुरुनगर – (93. 27), कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनियर कॉलेज, वाडा(94. 69), सीताबाई पाटोळे ज्युनियर कॉलेज,चाकण (97. 59), संत ज्ञानेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेज, आळंदी (94.47 टक्के), म.फ.गायकवाड विद्यालय ज्युनियर कॉलेज, दावडी(85. 71), रामभाऊ म्हाळगी विद्यालय ज्युनियर कॉलेज, कडूस (64. 70, सुमंत उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपरी बुद्रुक (66. 66), नवीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मरकळ(96. 23), शिवाजी विद्यालय, डेहणे(81. 91), रामचंद्र पाटील औटी उच्च माध्यमिक विद्यालय,आळंदी(70. 90), आर्ट्स, कॉमर्स ज्युनिअर कॉलेज,पाईट (90.69), महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज, राजगुरुनगर(100), नवचैतन्य उच्च माध्यमिक विद्यालय,काळूस (85. 33).

श्री भामचंद्र विद्यालय, भांबोली (97. 43), पी. के. कॉलेज कडाचीवाडी, चाकण(94. 59), उच्च माध्यमिक विद्यालय,वाशेरे (88. 46), नवमेश विद्यालय, चाकण (68), श्रीसमर्थ माध्यमिक विद्यालय, चिंबळी (99.42), बी. एम. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,बिरदवडी (87.50), आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, डेहणे (82. 72), आर्ट्स कॉमर्स कॉलेज, राजगुरुनगर (98.19), श्रीसमर्थ ज्युनिअर कॉलेज, नाणेकरवाडी(99. 70, ज्ञानवर्धिनी ज्युनियर कॉलेज, खेड (93.50),मॉडर्न हायस्कूल व ज्युनियर कॉलेज,भोसे (100),प्रियदर्शनी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, वाकी (100),श्रीशिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज, शेलपिंपळ्गाव (89. 36), डायनॅमिक इंग्लिश मीडियम व ज्युनियर कॉलेज, कडूस (100), होली अँगल स्कूल व ज्युनियर कॉलेज, चाकण (96.72), गव्हर्नमेंट आयटीआय, खेड (87.87), आदिराज प्राव्हेट आयटीआय खेड (75), हुतात्मा राजगुरु महाविद्यालय,राजगुरुनगर (90. 47),शिवाजी विद्यामंदिर व सीताबाई भिकोबा शेठ ज्युनिअर कॉलेज, चाकण (98.61).

हेही वाचा

 

Back to top button