16 महिन्यांत 74 जणांकडून उल्लंघन; वाहतूक नियमांना केराची टोपली

16 महिन्यांत 74 जणांकडून उल्लंघन; वाहतूक नियमांना केराची टोपली
Published on
Updated on
पुणे : अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे दिसून आले आहे. सोळा महिन्यात तब्बल 74 जणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असून, 16 वर्षांखालील मुला-मुलींवर साडेतीन लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, परवाना नसताना वाहन चालविणे, हेल्मेट नसणे, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे, भरधाव वेगात वाहन चालवून सिग्नल मोडणे अशा विविध नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, आयटी अभियंता तरुण, तरुणीच्या अपघाती मृत्यूमुळे पुन्हा एकदा अपघाताचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने आलिशान कार बेदरकारपणे चालवून या दोघांचा जीव घेतला. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हाती पालकांकडून वाहने दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.   2023 या वर्षात 16 वर्षवयीन मुलांवर वाहतुकींचे नियम मोडल्याप्रकरणी तब्बल 2 लाख 35 हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर 2024 वर्षात अवघ्या चार महिन्यांत 16 वर्षांखाली 26 अल्पवयीन मुला-मुलींवर वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 1 लाख 20 हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी सोळा महिन्यांत 3 लाख 55 हजारांची 74 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पुण्याची ओळख दुचाकींच्या शहराबरोबरच आता अपघातांचे शहर म्हणून होऊ लागली आहे. शहरात तब्बल 19 हून अधिक ब्लॅकस्पॉटवर अपघात होत असल्याचे वाहतूक विभागाने मागे केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. वाहतूक विभागाकडून या दृष्टीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात असताना त्याला म्हणावे इतके यश आले नसल्याचेच चित्र आहे. शहरातील ब्लॅकस्पॉटवर वारंवार अपघाताच्या घटना घडतच आहेत. त्यातच अल्पवयीन मुलांकडून भरधाव वेगात वाहने चालविण्याचे व वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रकार समोर येत आहेत.

रात्रीस वाढे वेग आणि अपघात

र्शहरात 2022 मध्ये अपघातात एकूण 327 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 75 मृत्यू हे रात्री 11 ते 1 च्या दरम्यान झालेल्या अपघातात झाले होते. रात्रीच्या वेळी रस्ता रिकामा असताना अजाणतेपणाने वाहनांचा वेग वाढतो आणि त्यामुळे अपघात होत असल्याचे पुणे पोलिसांच्या 2022 च्या रोड क्रश डेटा विश्लेषणातून समोर आले होते.

कारवाईबाबत कमालीची उदासीनता

शहरात मद्यप्राशन करून गाडी चालविणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. ही संख्या जरी लक्षणीय असली, तरी केवळ ठरावीक वेळीच ही कारवाई होताना दिसते. (उदा. 31 डिसेंबर) काही विशेष वेळीच पोलिस रस्त्यावर दिसतात. मात्र, इतर वेळी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हवर कारवाई होताना दिसत नाही. 2023 मध्ये 562, तर 2024 च्या चार महिन्यांमध्ये 479 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news