Cyber Crime | पुण्यात डॉक्टरला तब्बल 36 लाखांचा सायबर गंडा..

Cyber Crime | पुण्यात डॉक्टरला तब्बल 36 लाखांचा सायबर गंडा..
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने वारजे भागातील एका डॉक्टरची 36 लाख 59 हजार रुपयांंची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका 46 वर्षीय डॉक्टरांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टरांचा वारजे भागातील गणपती माथा परिसरात दवाखाना आहे. अनोळखी क्रमांकावरून डॉक्टरांच्या मोबाईल क्रमांकावर एकाने संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल. ऑनलाईन पद्धतीने शेअर बाजार गुंतवणूक करण्यास चांगली संधी असल्याचे आमिष चोरट्यांनी डॉक्टरांना दाखविले. त्यानंतर डॉक्टरांना एक लिंक पाठविण्यात आली.

समाज माध्यमातील एका समूहात त्यांना सहभागी करून घेण्यात आले. डॉक्टरांसह त्यांचा भाऊ आणि मित्राच्या खात्यातून चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी 36 लाख 59 हजार रुपये पाठविण्यात आले. चोरट्यांनी शेअर बाजारात चांगला नफा मिळाल्याचे भासविले. डॉक्टरांनी परताव्याबाबत विचारणा केली तेव्हा चोरट्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक निळकंठ जगताप तपास करीत आहेत.

कारवाईची भीती दाखवून फसवणूक

पोलिस कारवाईची भीती दाखवून फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी चंदननगर भागाातील एका तरुणीची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्यांनी तरुणीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. काळ्या पैशांच्या व्यवहारात कारवाई करण्यात येणार असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी भीती चोरट्यांनी तरुणीला दाखवली. तरुणीला तातडीने बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. तरुणीने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news