जामीनपात्र गुन्हा, पालकही जबाबदार; कलम 304 लागल्यास गंभीर गुन्हा

जामीनपात्र गुन्हा, पालकही जबाबदार; कलम 304 लागल्यास गंभीर गुन्हा
Published on
Updated on
 पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाची पोर्शे कार चालविणार्‍या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात दुचाकीला धडक दिल्याने आयटी इंजिनिअर असलेल्या तरुण-तरुणीचा शनिवारी (दि. 18) मृत्यू झाला. त्यानंतर येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कारचालक अल्पवयीन युवकाला बाल न्याय मंडळाने रविवारी जामीन मंजूर केला. समाजाच्या दृष्टिकोनातून एवढी गंभीर घटना ज्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यामध्ये जामीन कसा काय मिळाला याबाबत समाजमाध्यमात प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर दै. पुढारीने त्यावर शहरातील वकिलांशी चर्चा करत कायदेशीर बाबींची माहिती दिली.
अल्पवयीन युवकाविरोधात लावण्यात आलेले कलम व त्यामार्फत झालेला गुन्हा हा जामीनपात्र आहे. जामीनपात्र गुन्ह्यात न्यायालयात हजर केले तर जामीन मिळणे हा त्याचा कायदेशीर हक्क आहे. मोटर व्हेईकल अ‍ॅक्टमध्ये कलम 199 (ए) मध्ये एखाद्या अल्पवयीन व्यक्तीने या कायद्याखाली एखादा गुन्हा केला असेल तर त्याच्या गार्डियनला जबाबदार धरले जाऊ शकते. त्यादृष्टीने तपास होऊ शकतो. या प्रकरणात, कलम 304 (ए) लावला आहे. मात्र, कलम 304 लावले नाही. हेतूपुरस्सर एखादा गुन्हा केला हे तपासात निदर्शनास आले तर 304 हे कलम लागू होते. मात्र, पोलिसांच्या तपासादरम्यान अद्याप असे कलम लावलेले दिसून येत नाही.
– अ‍ॅड. चिन्मय भोसले,  फौजदारी वकील. 
वाहतूक कायद्यांमध्ये झालेल्या बदलानुसार अल्पवयीन विनापरवाना वाहन चालवणार्‍या व्यक्तींसह संबंधित व्यक्तींचे पालकसुद्धा जबाबदार असतात.  अपघात झाल्यानंतर पीडितांना व अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना बराच काळ अवघड व दीर्घकाळ चालणार्‍या प्रक्रियेतून न्यायालयात दाद मागून घ्यावी लागते, ज्या साठी खूप विलंब लागतो. बर्‍याचदा अपघातासबंधी निकाल उशिरा लागत असल्याने फारसा दिलासा मिळत नाही. अपघाताचे दावे हे जलद गतीने चालवण्यात यावे म्हणून निर्देश होणे गरजेचे आहे.
– अ‍ॅड. अजिंक्य मधुकर मिरगळ, फौजदारी वकील.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news