LokSabha Elections | बारामतीचा ‘मत’संग्राम! ‘हाय व्होल्टेज’ लढतीकडे देशाचे लक्ष | पुढारी

LokSabha Elections | बारामतीचा ‘मत’संग्राम! ‘हाय व्होल्टेज’ लढतीकडे देशाचे लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रित झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 7) मतदान होत आहे. या ‘हाय व्होल्टेज’ लढतीत दिलेला फैसला आज मतदान यंत्रात बंद होईल. या ‘मत’संग्रामासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून, सोमवारी मतदारसंघनिहाय साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. सर्व साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात पाच आणि पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेले दौंड विधानसभा मतदारसंघात 6, इंदापूर 5, बारामती 6, पुरंदर 17, भोर 9 व खडकवासला 44 अशी एकूण 87 मतदान केंद्रे आहेत. तर दौंड विधानसभा मतदारसंघात एकूण 309 मतदान केंद्रे आहेत. याकरिता एकूण टेबल 21 ची मांडणी करून 927 बॅलेट युनिट, 309 कंट्रोल युनिट, 309 व्हीव्हीपॅटचे शासकीय धान्य गोदाम, मदर तेरेसा चौक, नगरमोरी येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. 155 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरिता एकूण 2 हजार 597 मनुष्यबळ कार्यरत आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 330 मतदान केंद्र आहेत. याकरिता एकूण टेबल 35 ची मांडणी करून 1 हजार 188 बॅलेट युनिट, 330 कंट्रोल युनिट, 330 व्हीव्हीपॅट यंत्रांचे शासकीय धान्य गोदाम कालठण रोड येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. 165 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरिता एकूण 2 हजार 518 मनुष्यबळ कार्यरत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण 380 मतदान केंद्र आहेत. 1 हजार 140 बॅलेट युनिट, 380 कंट्रोल युनिट, 380 व्हीव्हीपॅट यंत्रांचे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळ परिसर येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.

190 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरिता एकूण 3 हजार 500 मनुष्यबळ कार्यरत आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात एकूण 421 मतदान केंद्र आहेत. 1 हजार 263 बॅलेट युनिट, 421 कंट्रोल युनिट, 421 व्हीव्हीपॅट यंत्रांचे श्री कातोबा हायस्कूल दिवे येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. 211 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरिता एकूण 3 हजार 377 मनुष्यबळ कार्यरत आहे भोर विधानसभा मतदारसंघात एकूण 561 मतदान केंद्र आहेत. 1 हजार 683 बॅलेट युनिट, 561 कंट्रोल युनिट, 561 व्हीव्हीपॅट यंत्रांचे भोर तालुक्याकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर आणि वेल्हे तालुक्याकरिता जुनी पंचायत समिती, वेल्हे व जिल्हा परिषद मध्यवर्ती शाळा कुरण खुर्द, मुळशी तालुक्याकरिता राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा कासारआंबोली येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.

281 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरिता एकूण 4 हजार 62 मनुष्यबळ कार्यरत आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण 465 मतदान केंद्र आहेत. 1 हजार 395 बॅलेट युनिट, 465 कंट्रोल युनिट, 465 व्हीव्हीपॅट यंत्रांचे स्प्रिंग डेल प्ले ग्रांऊड वडगाव बु. (ता. हवेली) येथून वितरण मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. 276 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. 4 हजार 49 मनुष्यबळ असणार आहे.

23 लाख 72 हजार मतदार

दौंड विधानसभा मतदासंघात 3 लाख 4 हजार 607, इंदापूर 3 लाख 23 हजार 541, बारामती 3 लाख 69 हजार 217, पुरंदर 4 लाख 29 हजार 351, भोर 4 लाख 7 हजार 921 व खडकवासला 5 लाख 38 हजार 31 असे एकूण मतदार 23 लाख 72 हजार 668 मतदार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात होणार्‍या निवडणुकीसाठी नियोजनाप्रमाणे तयारी करण्यात आली आहे. मतदान पथकाला साहित्याचे वितरण करण्यात आलेले असून सर्व अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत पोहोचतील. पोलिस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था आदींच्या अनुषंगानेही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या, 7 मे रोजी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून पात्र मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे.

– कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी

हेही वाचा

Back to top button