

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
भूमकर चौक ते हिंजवडीकडे जाणार्या मार्गातील धोकादायक असलेला यू टर्न वाहतूक विभागाने मंगळवार (दि. 30) रोजी बॅरिकेट्स लावून बंद केला.
भूमकर चौकातून हिंजवडीकडे जायचे असल्यास याच मार्गाला लागून समांतर मार्ग आहे. त्या मार्गामधून वळसा घेऊन सुरक्षीतरित्या हिंजवडीकडे जाता येते तसेच
सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी देखील थांबविता येत असल्यामुळे या मार्गात बॅरिकेट्स ठेवण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली.