पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनेक निवडणुका येथील आणि जातील. मात्र, ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. पंतप्रधानांनी स्वच्छ कारभार केला असून, ते जगात लोकप्रिय आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अजित पवार म्हणाले, नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि पुण्यातील विकासकामांना राज्यासोबतच केंद्राचा निधी येण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील, सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे यांना निवडून द्या. एक एक मत महत्त्वाचे आहे, त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे. विरोधकांकडे बोलण्यासारखे मुद्दे नाहीत. त्यामुळे ते संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार करून समाजामध्ये दुही माजविण्याचे काम करत आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.
विकसित भारत अॅम्बॅसिडरचे प्रमाणपत्र देताना पंतप्रधान मोंदीचे कटआउट लावले होते. त्यांसोबत छायाचित्र टिपण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. डोक्यावर टोपी व गळ्यात शेला परिधान करत उत्साह दिसत होता.
हेही वाचा