कात्रज घाटात वणवा! धूम्रपान करणार्‍यांमुळे वणवा लागण्याच्या घटना | पुढारी

कात्रज घाटात वणवा! धूम्रपान करणार्‍यांमुळे वणवा लागण्याच्या घटना

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : कात्रज घाटातील भिलारेवाडी वनक्षेत्रात रविवारी दुपारी वणवा लागला. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन तासांच्या अथक परिश्रमाने हा वणवा आटोक्यात आणला. घाट परिसरात दिवसा व रात्री पार्ट्या करणार्‍यांची संख्या वाढत असून, धूम्रपान करणार्‍यांमुळे वणवा लागण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. कात्रज घातील जुन्या बोगद्याजवळील पांढरा कडा परिसरात हा वणवा लागला. तळीरामांच्या पार्ट्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वनरक्षक संभाजी गायकवाड, वनसेवक संभाजी धनावडे, नागरिक दिलीप गोगावले यांनी हा वणवा आटोक्यात आणला.

वणव्याच्या घटनांमुळे वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, त्याबाबत वन विभाग गंभीर नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यांत कात्रज घाटात तळीरामांच्या पार्ट्या वाढू लागल्या आहेत. परिसरात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे सर्रासपणे दिसत आहेत. त्यामुळे वणव्याच्या घटना घडत आहेत. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी या भागात रात्री गस्त वाढवून गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

हेही वाचा

Back to top button