दुर्दैवी ! तो सांडव्यात गोधड्या धुण्यासाठी आला.. पण घरी परतलाच नाही | पुढारी

दुर्दैवी ! तो सांडव्यात गोधड्या धुण्यासाठी आला.. पण घरी परतलाच नाही

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरणाच्या सांडव्यात पोहताना अनिल लहु चव्हाण (वय 30, रा. भीमदीप झोपडपट्टी, बिबवेवाडी) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. अनिल हा खामगाव मावळ येथे मजुरीचे काम करत होता. तो सकाळी आकाश चव्हाण, बहीण ललिता व काही मजुरांसमवेत पानशेत धरणाच्या सांडव्यावर कपडे व गोधड्या धुण्यासाठी आला होता. त्या वेळी तो सांडव्यात पोहत असताना अचानक बुडून बेपत्ता झाला. त्यामुळे त्याच्या नातेवाइकांनी आरडाओरडा केला.

वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या देखरेखीखाली पानशेत पोलिस चौकीचे अंमलदार पंकज मोघे, पोलिस हवालदार युवराज सोमवंशी यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ, गुलाब धोंडेकर, संदीप सोळसकर, संजय चोरगे, गणेश जाधव, विजय जावळकर आदींनी सलग तीन तास शोधमोहीम राबवली. त्यानंतर अनिल याचा मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

वर्षभरात सहा जणांचा बुडून मृत्यू

पानशेत धरणाखालील सांडव्यात गेल्या वर्षभरात सहा जणांचे बुडून मृत्यू झाले आहेत. धरणातून वीज निर्मितीसाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जात आहे. या ठिकाणी दुर्घटना घडूनही पर्यटकांची मौजमजा करण्यासाठी सुटीच्या दिवशी झुंबड उडत आहे. तसेच नागरिक पोहण्यासाठी कपडे, गोधड्या धुण्यासाठी सांडव्यात गर्दी करत आहेत.

हेही वाचा

Back to top button