सुरक्षारक्षक, कामगाराला ठेवले बांधून,नंतर टाकला दरोडा; रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील प्रकार | पुढारी

सुरक्षारक्षक, कामगाराला ठेवले बांधून,नंतर टाकला दरोडा; रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील प्रकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रामटेकडीतील औद्योगिक वसाहतील कंपनीच्या सुरक्षारक्षकाला, तसेच कामगाराला दोरीने बांधून ठेवत चोरट्यांनी दरोडा टाकून 12 हजारांचे कॉपर चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात दरोडेखोरांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस लक्ष्मण ढगे (वय 29, रा. कदमवाक वस्ती) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांची रामटेकडी औद्योगिक वसाहतीत हारको ट्रान्स्फॉर्म्स लिमिटेड कंपनी आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून रामगोपाल सुंदरलाल गुप्ता यांच्यासह कंपनी कामगार नितीन कोंडिबा शेडगे यांना ठेवण्यात आले होते. यादरम्यान, रात्री दीडच्या सुमारास दरोडेखोर आत शिरले. त्यांनी दोघांना दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर कंपनीच्या खिडकीच्या ग्रील कटरच्या साहाय्याने तोडून त्यावाटे आत शिरत 12 हजार 390 रुपयांचे 14 किलो वजनाचे कॉपर चोरून नेले. पुढील तपास वानवडी पोलिस करत आहेत.

हेही वाचा

Back to top button