Loksabha election 2024 | पुणे 11, तर शिरूरमधून 7 उमेदवारांचे अर्ज

Loksabha election 2024 | पुणे 11, तर शिरूरमधून 7 उमेदवारांचे अर्ज
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार सोमवारपर्यंत (दि. 22) पुणे मतदारसंघातून 11 उमेदवारांनी, तर शिरूर मतदारसंघातून 7 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. जिल्ह्यात दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आजतागायत महाविकास आघाडीकडून काँग्रेस गटाचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी, तर वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांचा अर्ज दाखल झाला आहे.

त्याचबरोबर स्थानिक पक्ष आणि अपक्ष मिळून 9 अशा तब्बल 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर 80 व्यक्ती अर्ज घेऊन गेले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याचबरोबर स्थानिक पक्ष आणि अपक्ष उमेदवार म्हणून 6 व्यक्तींकडून असे एकूण 7 अर्ज दाखल झाले आहेत, तर 73 व्यक्ती अर्ज घेऊन गेले आहेत. दोन्ही मतदारसंघांत ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, त्यांच्या कागदपत्रांमध्ये असलेल्या त्रुटींसंदर्भात उमेदवारांना संपर्क साधून असलेल्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. 25 एप्रिल रोजी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.

शनिवारवाडा गेटवर पावणेचार लाखांची रोकड जप्त

शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा गेट नाक्यावर 24 तास पोलिस व प्रशासन यांचे पथक कार्यरत असते. शनिवारवाडा गेट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाचे एसएसटी पथक प्रमुख रमेश पाटील, पीएसआय असगर अली सय्यद, पी.सी.बोराडे, नागरगोजे येथे कार्यरत होते. सोमवारी सकाळच्या सुमारास शनिवारवाडा गेट परिसरात वाहनांची तपासणी सुरू असताना ऑडी कारची (क्र.एमएच12 एसवाय 9081) अडवून झडती घेतली असताना त्यात 3 लाख 80 हजार 500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सदर रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने कसबा विधानसभा अंतर्गत शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा परिसर तसेच स्वारगेट परिसरातील नटराज हॉटेल या नाक्यांवर पोलिसांकडून संशयास्पद वाहनांची कसून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये संबंधितांचे गाडी नंबर, नावाची रजिस्ट्ररमध्ये नोंद केली जात आहे.

हेही वाच

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news