विद्यार्थ्यांना खुशखबर! उन्हाळी सुटी 2 मे पासून | पुढारी

विद्यार्थ्यांना खुशखबर! उन्हाळी सुटी 2 मे पासून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना येत्या 2 मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. तर विदर्भ वगळता राज्यात नवीन शैक्षणिक सत्र 15 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. तर विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याचे प्राथमिक आणि माध्यमिकच्या संचालकांनी स्पष्ट केले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी एकत्रित परिपत्रक जाहीर केले आहे.

त्यानुसार संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दि. 2 मेपासून सुटी जाहीर करण्यात येत आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागांतील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार, दि.15 जून 2024 रोजी सुरू करण्यात याव्यात. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुटीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा 30 जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दि.01 जुलैपासून सुरू करण्यात याव्यात.

हेही वाचा

Back to top button