कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जाताहेत. जे धमक्या देतात त्यांना माझा मोबाईल नंबर द्या. तुम्ही दिल्लीत ज्यांना घाबरता त्यांच्यासमोर संसदेत मी आणि डॉ. अमोल कोल्हे जनतेच्या प्रश्नांसाठी ताठ मानेने आवाज उठवतो. आतापर्यंत संस्कार आणि कुटुंबातील निर्णयानुसार मी कधी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, दूध आणि सहकार संस्थांच्या निवडणुकीत लक्ष दिले नव्हते. परंतु यापुढील होणार्या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील.
– सुप्रिया सुळे, उमेदवार, बारामती
पराभव दिसू लागल्याने विरोधक वैयक्तिक टीका करू लागले आहेत. पाच वर्षांत दिसला नाहीत, विकास केला नाही, नटसम—ाट असे आरोप होत आहेत. नटसम—ाट, कार्यसम—ाट म्हणणे परवडते. पण खोकेसम—ाट, धोकेसम—ाट, पलटीसम—ाट नको. निधी देतो, मते कचा कचा कचा द्या, असे म्हणणे म्हणजे ही सत्तेची मस्ती आहे.
– डॉ. अमोल कोल्हे, उमेदवार, शिरूर.
कसबा पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांना पोलिस आणि प्रशासनाकडून त्रास देण्यात येत होता. गुंडांकडून धमकावण्यात येत होते. तसाच प्रकार आता सुरू झाला आहे. कुठल्याही कार्यकर्त्याला प्रशासनाकडून त्रास झाल्यास त्यांना माझा मोबाईल नंबर द्या, त्यांची रात्र काळी कशी करायची, हे मी पाहातो.
– रवींद्र धंगेकर, उमेदवार, पुणे