अंगावरील तीळ दाखव; ऑन कॅमेरा तरुणीसोबत संतापजनक कृत्य | पुढारी

अंगावरील तीळ दाखव; ऑन कॅमेरा तरुणीसोबत संतापजनक कृत्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फेडेक्स कुरिअर, एन.सी.बी., मुंबई क्राईम ब्रॅंचच्या फंड्याने नागरिकांना भीती घालून सायबर ठगांकडून लाखो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढीस लागले आहेत. तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये ड्रग सापडले असून, बँक खाते दहशतवादी कारवायांसाठी लिंक असल्याची भीती घालून फसविले जात आहे. अशाच एका पार्सल फ्रॉडच्या घटनेत तपासणीचा भाग म्हणून तरुणीला चक्क ऑन कॅमेरा अंगावरील तीळ दाखविण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आयटी अभियंता असलेल्या एका 28 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. या तरुणीला ब्लॅकमेल करीत पाच महिन्यांत तब्बल 14 लाखांचा गंडा घालण्यात आला. याबाबत विमानतळ पोलिसांनी सायबर ठगांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणूक आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये फेडेक्स कंपनी मुंबई आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी असल्याचे फिर्यादी तरुणीला भासविण्यात आले.

तिला सांगण्यात आले की, तिच्या नावाने तैवानला पार्सल जात आहे. यात पाच पासपोर्ट, आयसीआय बँकेचे सहा क्रेडिट कार्ड आणि 950 ग्रॅम ड्रग सापडले आहे. हे पार्सल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईने पकडले आहे. तसेच तुमचे बँक खाते दहशतवाद्यांशी संबंधित असल्याची भीती घातली. त्यानंतर तपासणीच्या नावाखाली 13 लाख 94 हजार रुपये चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यात वर्ग करून घेतले. तसेच आमची लेडी ऑफिसर बोलत असून, शरीरावरील तीळ स्काईप आयडीवरून दाखविण्यास भाग पाडले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button