Weather update : चाळीशीच्या पाऱ्यात पुणेकरांना हलक्या सरींचा दिलासा..

Weather update : चाळीशीच्या पाऱ्यात पुणेकरांना हलक्या सरींचा दिलासा..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि परिसरातील चिंचवड आणि कोरेगाव पार्क भागाचे कमाल तापमान सोमवारी 42 अंशांवर पोहोचले, तर किमान तापमान 22 ते 27 अंशांवर स्थिरावले. या तापमानामुळे शहरात दिवसभर उन्हाची प्रखर तीव्रता जाणवत होती.
दरम्यान, सायंकाळच्या सुमारास शहराच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे हवेत गारवा तयार झाला. परिणामी उकाड्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली. पुण्यासह पिंपरी, चिंचवड आणि जिल्ह्याच्या सर्वच भागांत मागील काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे.

त्यामुळे उष्णतेची लाट वाढली आहे, तर रात्री उकाड्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. या प्रकारामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. त्यातच सोमवारी दिवसभर शहर परिसरात तीव्र उष्णता होती. सायंकाळच्या सुमारास शहराच्या बहुतांश भागांत ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा तयार होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस शहराचा कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास, तर संध्याकाळी ढगाळ वातावरण राहणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news