दु्र्दैवी : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू | पुढारी

दु्र्दैवी : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू

रावेत : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरून निघालेल्या पोलीस हवालदार सचिन नरुटे (वय ३८, रा. वाकड) यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १५) रात्री साडेदहाच्या सुमारास बंगळुरू-मुंबई महामार्गावर रावेत येथे घडली. अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे. सचिन नरुटे देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नरुटे यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुली आहेत.

हेही वाचा

Back to top button