आप्पासाहेब जगदाळेंसह, हर्षवर्धन पाटलांचे दोन उपाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात..! | पुढारी

आप्पासाहेब जगदाळेंसह, हर्षवर्धन पाटलांचे दोन उपाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात..!

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आप्पासाहेब जगदाळे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याचे दोन उपाध्यक्ष भरत शहा आणि कांतीलाल झगडे शरद पवारांच्या गोटात जाणार आहेत. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व असणारे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे शरद पवारांना साथ देणार असल्याचे समजते.

भरत शहा यांचे इंदापूर शहारत वर्चस्व आहे,ते कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत.निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. कर्मयोगी व नीरा भीमा हे दोन सहकारी साखर कारखाने भाजपाचे हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहेत. दोन्ही कारखान्याचे उपाध्यक्ष करणार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. मंगळवारी इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button