धक्कादायक! बंद सदनिकेत आढळले दांपत्याचे मृतदेह; खून की घातपात? | पुढारी

धक्कादायक! बंद सदनिकेत आढळले दांपत्याचे मृतदेह; खून की घातपात?

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरात शनिवारी (दि. १३) भर दुपारी एका सदनिकेमध्ये एका दांपत्याचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱयांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सचिन महालिंग वाघोलीकर (वय ५०) व त्यांच्या पत्नी सारिका (वय ४२) या दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. शहरातील जामदार रस्त्यावरील खत्री-पवार पार्कमधील सदनिका क्रमांक १०२ मध्ये ही घटना उघडकीस आली.

त्यांची मुले शनिवारमुळे शहरानजीक कन्हेरी येथे मारुती मंदिरात दर्शासाठी गेली होती. ती परत आली असता सदनिकेला बाहेरून कडी असल्याचे दिसून आले. त्यांनी कडी काढून आतमध्ये प्रवेश केला असता बेडरूममधील कपाट व दुसऱया खोलीतील डबे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. किचनमध्ये पाहिले असता या दोघांचे मृतदेह आढळून आले. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला की घातपात याबद्दल विविध तर्कांना उधाण आले आहे.

हेही वाचा

Back to top button