

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उद्या रविवारी (दि.14) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पीएमपीच्या बस गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता पीएमपी प्रशासनाने रविवारी आपल्या काही बस मार्गांमध्ये बदल केला आहे. या बदलांनुसार पीएमपीच्या प्रवाशांनी प्रवास करावा, असे आवाहन पीएमपी अधिकार्यांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा