बारामतीत दोन लाखांचे मताधिक्य मिळाले पाहिजे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

बारामतीत दोन लाखांचे मताधिक्य मिळाले पाहिजे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सासवड : पुढारी वृत्तसेवा : गेल्या 15 वर्षांत बारामती लोकसभा मतदारसंघात फक्त खेळखंडोबा झाला. काहीही काम झालं नाही. अजित पवार आणि विजय शिवतारे सोबत आहेत. आता बारामती लोकसभा मतदारसंघात दोन लाखांचे मताधिक्य मिळाले पाहिजे. तुम्ही दिलेले मत हे देशाच्या विकासाला मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सासवड (ता. पुरंदर) येथील संत श्रीज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर गुरुवारी (दि. 11) महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी जनसंवाद सभेत शिंदे बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, वासुदेव काळे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, अशोक टेकवडे, रूपाली चाकणकर, डॉ. ममता लांडे, जालिंदर कामठे, बाबा जाधवराव, दिलीप यादव, गंगाराम जगदाळे, नाना भानगिरे, रमेश कोंडे, गणेश ढोरे आदी पदाधिकार्‍यांसह हजारो शेतकरी बांधव, महिला व युवावर्ग उपस्थित होते.
सर्व टीव्ही चॅनेलवर विजय शिवतारे दिसायचे, मला फोन यायचे आणि त्यांना सांगा मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करायचं आहे असे सांगायचे.

तुमच्या उभ्या राहण्याने महायुतीला तडा जाईल, असे विजय शिवतारे यांना मी सांगितले. सरकार हे लोकांच्या हितासाठी हवं आहे आणि आपलं सरकार तसंच आहे. आज लोकांच्या पायाखाली वाळू सरकली आहे. कारण आम्ही काम करतो आहे. या निवडणुकीवर सार्‍या देशाचे लक्ष आहे. त्याच्या विजयाचे शिल्पकार या महायुतीचे सरकार होणार असून, शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. पुढचा पुरंदरचा किल्लेदार विजय शिवतारे असतील, अशी घोषणा ही शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या सरकारने 45 हजार कोटी रुपये शेतकर्‍यांना दिले.

आम्ही दिलेला शब्द पाळतो, घरात बसून काम करता येत नाही. उंटावरून शेळ्या राखता येत नाही, त्यामुळे आम्ही फिल्डवर काम करतो, अस नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. याप्रसंगी हरिभाऊ लोळे, अतुल मस्के, माणिक निंबाळकर, नीलेश जगताप, तुषार हंबीर, मंगेश भिंताडे, अविनाश बडदे, सचिन भोंगळे, मिलिंद इनामके, प्रवीण लोळे, भूषण ताकवले, रमेश इंगळे, नितीन कुंजीर, अमित झेंडे आदी उपस्थित होते.

गुंजवणीचे पाणी युद्धपातळीवर आणू हा माझा शब्द : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गुंजवणीचे पाणी युद्धपातळीवर करून घेऊ, हा मी शब्द देतो. अनेक लोकांचे लक्ष बारामती लोकसभेवर आहे. राजकारणात कुणीच कुणाचा मित्र आणि शत्रू नसतो. देशाचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा याची ही निवडणूक आहे. मागील 15 वर्षांत खासदाराने दिला नसेल त्याच्यापेक्षा जास्त निधी हा उमेदवार आणेल, असे स्पष्ट मत पवार यांनी मांडले.

हेही वाचा

Back to top button