बाटलीने प्रशासन लावले कामाला : निवडणूक काळात प्रशासन सतर्क | पुढारी

बाटलीने प्रशासन लावले कामाला : निवडणूक काळात प्रशासन सतर्क

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने विविध भरारी पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे. या पथकाला कोथरूडमध्ये एका डिलिव्हरी बॉयकडे सापडली दारूची बाटली. पण मग आता काय कारवाई करायची, असा प्रश्न पथकाला पडला. त्यांनी कळवलं वरिष्ठांना आणि मग मतदारसंघातील सगळं प्रशासनाच या एका बाटलीसाठी कामाला लागले.
दारूची बाटली खरेदी कोणत्या दुकानातून घेतली. दारूचे लायसन किंवा दारू बाळगण्यासंदर्भात असलेला परवाना या सर्व गोष्टीची पडताळणी करणे पथकाला मोठे जिकरीचे झाले.

त्यामुळे अखेर या पथकाने दारूची बाटली आणि पंचनाम्याचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठवून दिला. उत्पादन शुल्क विभागाने या दारूचे बाटलीचे नेमके केले काय, याबद्दलचा अहवाल मात्र अद्याप उपलब्ध झाला नाही अथवा प्रशासनाकडूनदेखील अंतिम निर्णय काय झाला हीदेखील माहिती समजू शकली नाही. दरम्यान, आचारसंहिता अंमलबजावणी पथकाला कोथरूडमध्ये तपासणी करताना डिलिव्हरी बॉयकडे दारूची बाटली सापडली. ही बाटली जप्त करून कारवाईचा निर्णय पथकाने घेतला. मात्र, नेमकी कार्यवाही काय करावी आणि कशी करावी याची पुरेशी कल्पना नसल्याने पथकातील अधिकार्‍यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधला. सापडलेली दारूची बाटली पकडली गेल्याने त्या डिलिव्हरी बॉयला सोडूनदेखील देता येईना. त्यामुळे प्रत्यक्ष आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे या दारूच्या बाटलीची कार्यवाही करावी लागली.

हेही वाचा

Back to top button