रमजान ईदनिमित्त वाहतुकीत बदल; असा असेल बदल | पुढारी

रमजान ईदनिमित्त वाहतुकीत बदल; असा असेल बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रमजान ईदनिमित्त शहरात आज विविध भागांमध्ये सामूहिक नमाज पठण करून ईद साजरी केली जाणार आहे. ईदगाह मैदानाच्या जवळपास यानिमित्त मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेकडून तात्पुरत्या स्वरूपात काही बदल करण्यात आले आहेत. आज अथवा उद्या सकाळी 6 ते नमाज पठण पूर्ण होईपर्यंत काही रस्त्यांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे. यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग नमाज पठणाच्या वेळी बंद राहणार आहे. सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक नमाज पठणाच्या वेळी बंद राहणार आहे. सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक बंद राहणार आहे. सोलापूर रोडने मम्मादेवी चौक येथे येणारा वाहतूक ही गोळीबार चौकाकडे जाण्यास बंद राहणार आहे. भैरोबानाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथे बंद राहणार आहे. कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणार्‍या सर्व जड मालवाहतूक वाहने, प्रवासी बसेस, एसटी बसेस, पीएमपी बसेस यांना प्रवेश बंद राहणार आहे.

कोंढवा वाहतूक विभागांतर्गत करण्यात आलेले बदल ज्योती हॉटेल चौकातून फकरी हिल्स चौक मार्गे कमेला, साळुंके विहार येथे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात येत आहे. ज्योती हॉटेल चौकातून डावीकडे वळून मेफेअर जंक्शनमार्गे पारगेनगरकडे जाणार्‍या जड वाहतुकीस ज्योती हॉटेलकडून डावीकडे वळण्यास बंदी करण्यात येत आहे.पारगेनगर येथून मेफेअर जंक्शनमार्गे ज्योती हॉटेलकडे जाणारी जड वाहतूक बंद करण्यात येत आहे.

हेही वाचा

Back to top button