Chakan : वाहतूक कोंडीने चाकणकर बेजार..! | पुढारी

Chakan : वाहतूक कोंडीने चाकणकर बेजार..!

 पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. शुक्रवार (दि. 5) पासून मागील तीन दिवसांत दिवसा आणि विशेषतः सायंकाळी या महामार्गावर पुन्हा एकदा मोठी कोंडी झाली. त्यामुळे स्थानिकांसह वाहनचालक आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी ही समस्या मोशीपासून पुढे चिंबळी फाटा, एमआयडीसी फाटा, आळंदी फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक भागात होते. या वाहन कोंडीने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

विविध कारणांमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. मागील दोन-तीन दिवसांत सायंकाळी सहानंतर स्पायसर चौक ते कुरुळी फाटादरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. चाकणमधील तळेगाव चौक, आंबेठाण चौक, भागात आणि चाकण शिक्रापूर रस्त्यावर माणिक चौक भागातदेखील बराच वेळ प्रवाशी आणि वाहनचालकांना या कोंडीत अडकून पडावे लागल्याची स्थिती पाहावयास मिळाली.

नेतेमंडळींचे वाहतूक कोंडीच्या समस्येकडे दुर्लक्ष

निवडणुकीत आश्वासने देणारे पक्ष आणि विकासाच्या रांगोळ्यांची भाषा वापरणारे त्यांचे कर्तृत्ववान नेते या वाहतूक कोंडीकडे सोयीने दुर्लक्ष करत आहेत. केवळ द्रुतगती महामार्ग, एलिव्हेटेड महामार्गाच्या घोषणा होत असून, त्या घोषणा पुन्हा हवेत विरत असल्याचा मागील 20 वर्षांचा येथील जनतेचा अनुभव आहे.

हेही वाचा

Back to top button