सुप्रिया सुळे समर्थक दशरथ मानेंच्या घरी देवेंद्र फडणवीस यांची भेट | पुढारी

सुप्रिया सुळे समर्थक दशरथ मानेंच्या घरी देवेंद्र फडणवीस यांची भेट

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांचे समर्थक सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दौंडचे भाजप आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भेट दिली. माने कुटुंबाने त्यांचे जोरदारपणे स्वागत केले. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मंगलदास बांदल हे सुध्दा उपस्थित होते.

Back to top button