खुशखबर ! जुना पुणे-मुंबई रस्त्यावर लवकरच दुहेरी वाहतूक | पुढारी

खुशखबर ! जुना पुणे-मुंबई रस्त्यावर लवकरच दुहेरी वाहतूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम दोन दिवसांत पूर्ण होणार असून, या रस्त्यासह सध्या एकेरी असलेल्या खडकी बाजार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर लवकरच दुहेरी वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासह वळसा मारून जाणेही वाचणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडण्यासाठी जुना मुंबई-पुणे महामार्ग हा महत्त्वाचा रस्ता आहे. पिंपरी हद्दीत दापोडीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, परंतु पुणे महापालिका हद्दीत खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीमध्ये भूसंपादनाअभावी 2.1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण होऊ शकले नव्हते.

हा रस्ता अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस ब्रीज) 42 मीटर रुंदीचा रस्ता अपेक्षित आहे. मात्र, लष्कराच्या ताब्यात जागा असल्याने तो 21 मीटर रुंदीचा होता. लष्कराने महापालिकेच्या ताब्यत जागा दिल्यानंतर पथ विभागाने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. बोपोडी ते संविधान चौक यादरम्यानचे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याचे काम दोन दिवसांत होईल. रस्त्याची पाहणी झाल्यानंतर लवकरच दोन्ही रस्ते दुहेरी वाहतुकीसाठी सुरू होतील, असे पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button