‘नेट’चे अर्ज भरण्याच्या वेळापत्रकाबाबत मोठी माहिती समोर.. | पुढारी

‘नेट’चे अर्ज भरण्याच्या वेळापत्रकाबाबत मोठी माहिती समोर..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी समाजमाध्यमाद्वारे या वर्षी जूनमध्ये होणार्‍या यूजीसी नेट 2024 या परीक्षेचे अर्ज भरण्यास याच आठवड्यात सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यूजीसी नेट 2024 परीक्षेची तारीख, अधिसूचना आणि ऑनलाइन अर्ज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केले जातील. परीक्षेची तपशीलवार माहिती यूजीसीच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. दरम्यान, यूजीसीने नेट परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे पीएचडी प्रवेशासाठी परवानगी दिली आहे.

यूजीसी नेट परीक्षा वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. सध्या यूजीसी नेटचे गुण ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी पात्रता आणि पदव्युत्तर पदवीधारकांसाठी सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी ग्राह्य धरले जात आहेत. परंतु, आता पीएचडीचे प्रवेशही नेटच्या गुणांच्या आधारे दिले जाणार आहेत. नेट ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे, तर सहायक प्राध्यापक पदासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.

हेही वाचा

Back to top button