आळे येथे दिसून आली तरसाची दोन पिल्ले..! | पुढारी

आळे येथे दिसून आली तरसाची दोन पिल्ले..!

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : आळे येथील कैचन मळ्यातील संजय सुभाष कुऱ्हाडे यांच्या उसाची तोडणी करीत असताना तरसाची दोन पिल्लं आढळून आली. दरम्यान वन विभागाने घटनास्थळी भेट दिली असून ही दोन पिल्लं तरसाची असल्याचे सांगितले. तसेच त्यांची मादी पिल्लाना घेऊन जाईल, घाबरण्याचे कारण नाही. बाजूची ऊस तोडणी सुरु ठेवा अशा सूचना ऊस तोडणी मजुरांना दिल्या आहेत.

जुन्नर तालुक्यात आता बिबट्या बरोबरच तरसाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरसाने कुठे मानवावर हल्ला केल्याची घटना घडली नाही; तथापी पाळीव कुत्रे यांच्यावर तरसाचे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरस हा प्राणी बिबट्याने खाल्लेली अर्धवट राहिलेली शिकार खात असतो. व तरसामुळे बिबट्या दूर जातो, असा दावा वन विभागाकडून केला जात असून तरसाची संख्या वाढल्यास बिबट्या उसाच्या शेतापासून दूर जाऊ शकतो, असे वन विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा

Back to top button