वसंत मोरें-प्रकाश आंबेडकर भेट! आंबेडकरांची मोरेंबाबत ‘ही’ भूमिका समोर | पुढारी

वसंत मोरें-प्रकाश आंबेडकर भेट! आंबेडकरांची मोरेंबाबत 'ही' भूमिका समोर

पुणे : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास वसंत मोरे इच्छुक असल्याची माहिती समोर आली. त्यासंदर्भात आज वसंत मोरे यांनी मुंबईला जाऊन प्रकाश आंबेडकरांची भेटही घेतली. त्याआधी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मोरेंची फोनवरून चर्चा झाली होती. आज मुंबई येथे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मोरेंची भेट झाली. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हटले की मोरे यांच्या उमेदवारीबद्दल 2 तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीबाबत बोलतांना आंबेडकर म्हटले की महाविकास आघाडीला अजून स्पष्ट नकार नाही. तसेच यावेळी वसंत मोरे सुद्धा उपस्थित होते. महाविकास आघाडी संदर्भात अधिक प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी बोलणे टाळले.

वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर याचा तोटा महाविकास आघाडीला होईल की महायुतीला? हे पाहावं लागेल. वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची सुद्धा भेट घेऊन आपण निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे कळवले होते. परंतु कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्याने मोरे यांनी ‘ऐकला चलो’चा नारा दिला होता. परंतु आज मात्र त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळावी ही इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा

Back to top button