Loksabha election 2024 : निवडणूक तयारीचा डॉ. दिवसेंकडून आढावा | पुढारी

Loksabha election 2024 : निवडणूक तयारीचा डॉ. दिवसेंकडून आढावा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी साठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आढावा घेतला. मतदानाच्या वेळी उन्हापासून संरक्षणासाठी करावयाच्या व्यवस्थेबाबत माहिती घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, सारथी पुणे विभागीय कार्यालयाचे उपव्यवस्थापकीयसंचालक अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, समन्वयक अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते. डॉ. दिवसे म्हणाले, स्थिर आणि भरारी पथकांनी पूर्णक्षमतेने काम करावे. आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास त्वरित गुन्हे दाखल करून अहवाल सादर करावा.

केंद्रांची पाहणी

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मुळशी परिसरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील सुविधांचा माहिती घेतली, तसेच आवश्यक सूचना केल्या. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, मुळशी तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक मनोज कुमार यादव आदी उपस्थित होते. डॉ. दिवसे यांनी कासार आंबोली येथील साहित्यवाटप व स्वीकृती केंद्राची पाहणी केली.

हेही वाचा

Back to top button