माझ्याकडे घोटाळ्यांच्या 11 फाईल्स : रोहित पवारांची वळसे पाटील आणि मुश्रीफांवर टीका

माझ्याकडे घोटाळ्यांच्या 11 फाईल्स : रोहित पवारांची वळसे पाटील आणि मुश्रीफांवर टीका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मला निनावी व्यक्तिने 11 फाईल पाठवल्या आहेत. त्यापैकी दोन फाईल मी आणल्या आहेत. ज्यामधे महत्वाच्या खात्यातील भ्रष्टाचाराची माहिती आहे. अशी माहिती रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढे ते म्हणाले की पहिला घोटाळा आश्रम शाळेतील घोटाळ्याचा आहे. राज्यातील 1 लाख 87 हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी 250 मीली दुध देणे आवश्यक होते. पहिला करार 18-19 आणि दुसरा करार 2023 – 2024 दरम्यान झालेला आहे. या करारानुसार 146 रुपये प्रति लिटर दराने कंत्राटदारास पैसे देण्यात आले. शेतकऱ्यांकडून तीस रुपये प्रति रुपये तर टेट्रा पॅक पंचावन रुपये प्रति लिटरने दुध खरेदी करायला हवे होते. यासाठी 85 कोटी रुपये खर्च यायला हवा होता. मात्र प्रत्यक्षात 165 कोटी रुपये देण्यात आले आणि 80 कोटींची दलाली देण्यात आली. यासाठी आंबेगाव तालुक्यातील एका खाजगी दुध उत्पादक संस्था आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सहकारी दुध उत्पादक संस्थेला कंत्राट देण्यात आले. त्यामुळेच जे विकासासाठी आम्हला सोडून गेले असे दावा करतायत त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच हे ठरवले होते का? अस प्रश्न ही आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.

दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप

रोहित पवार म्हटले की एकुण 11 फाईल्स आहेत, उरलेल्या नऊ फाईल्स मधील घोटाळे टप्प्या टप्प्याने उघड करणार. त्यानंतर त्यांची झोप उडेल. आंबेगाव मधील पराग डेअरी ही खाजगी संस्था तर वारणा ही सहकारी संस्था लाभधारक असल्याचे सुद्धा पवार यांनी सांगितले. पुढे बोलताना पवार म्हटले की दुसरा घोटाळा हा समाजकल्याण विभागातील आहे. समाजकल्याण विभागातील हे कंत्राट एक हजार पन्नास कोटी रुपयांचे तीन वर्षांसाठीचे कंत्राट आहे . आधी ही कंत्राटे डिसेंट्रलाईज पद्धतीने होत होती ती कंत्राटे सेंट्रलाईज करण्यात आली. एस सी, एस टी विद्यार्थ्यांना आहार पुरवण्यासाठी हा करार होता. यासाठी चार कंपन्यांना कंत्राट देण्यात आले होते. ब्रिक्स इंडिया, बी.व्ही.जी. , क्रिस्टल गारमेंट आणि कैलास फुड एन्ड किराणा या कंपन्यांना कंत्राट मिळाले. त्यात कैलास फुड आणि किराणा ही सातारची कंपनी तर एक उप कंपनी नाशिकची आहे. क्रिस्टल कंपनीला साठ कोटींचा दलालीचा फायदा झाला आहे. तर बी.व्ही. जी. ला तीस कोटी रुपयांची दलाली मिळाली आणि डी. एम. एंटरप्रायजेस ही उप कंपनी देखील लाभधारक आहे. असेही रोहित पवार म्हटले.

त्यांतर पवार म्हटले की या कंपन्यांना आहार पुरविण्याचा अनुभव नाही. काही कंपन्या वॉचमन पुरवतात तर काही कंपन्या क्लिनिंग आणि लॉन्ड्री सेवा देतात. डी एम एंटरप्रायजेस ही कंपनी पत्त्यावर अस्तित्वात नाही. यातील एक खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संबंधित तर दुसरे खाते अजित पवारांशी संबंधित असल्याचे सुद्धा रोहित पवारांनी सांगितले. रोहित पवार म्हणाले की आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यानीच आदिवासी मुलांचे नुकसान केले. हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित ब्रीक्स इंडिया कंपनीला कंत्राटे मिळाली. या कंपनीवर इडी ची कारवाई होत असतानाच ही कंत्राटे देण्यात आली आहेत. कैलास फुड आणि किराणा या कंपनीच्या पत्त्यावर एक साधे किराणा दुकान आहे. साताऱ्यामधील शुक्रवार पेठतील या दुकानाला शेकडो कोटींचे कंत्राट देण्यात आले. अशी घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news