जनतेच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर : दिलीप वळसे पाटील | पुढारी

जनतेच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर : दिलीप वळसे पाटील

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : जनतेच्या विकासासाठी नेहमीच कटिबध्द राहू. ज्यांनी निवडून दिले त्या जनतेला विसरणार नाही, अशी ग्वाही सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन गुरुवारी ( दि.7) मंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, शिरूर आंबेगावचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, घोड व मीना कालवा सल्लागार समिती सदस्य प्रकाश वायसे.

शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे, माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, देखरेख संघाचे अध्यक्ष बाबाजी निचित, घोडगंगा कारखान्याचे तज्ज्ञ संचालक सोपानराव भाकरे, सरपंच शिल्पा निचित, उपसरपंच विक्रम निचित, काठापूरचे माजी सरपंच बिपिन थिटे, जांबुतचे सरपंच दत्तात्रय जोरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच विक्रम निचित यांनी केले. सूत्रसंचालन डी. एम. नीचित तर आभार उद्योजक नवनाथ निचित यांनी मानले. या वेळी कुकडी नदीवरील पुलाबरोबरच येथील वि. का. सेवा सहकारी सोसायटी नवीन इमारत, खंडोबा मंदिर सभामंडप, दशक्रिया विधी वेटिंग शेड सभामंडप, खंडोबा मंदिर ते कापसे – राऊतवस्ती रस्ता, वडनेर ते जांबुत रस्ता तयार करणे या कामांचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

विकासकामांसाठी वळसे पाटलांना साथ द्या

घोड व कुकडी नदीवरील बंधारे, सोसायटी इमारत भूमिपूजन, रस्ते, वीज, पाणी या सुविधा आणि विकास सहकारमंत्री वळसे पाटील यांच्यामुळेच झाला आहे. तसेच शिरूरच्या बेट भागातील राहिलेली विकासकामे करायची असतील, आपली सर्वांची परिस्थिती बदलायची असेल तर वळसे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे लागेल, असे प्रतिपादन माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले.

हेही वाचा

Back to top button